आरटीओ कार्यालयातील अनाधिकृत एजंट संजय गावंडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी



चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये संजय गावंडे नामक अनाधिकृत एजंट दररोज वावरत असतो. आरटीओ कार्यालयामध्ये दररोज चंद्रपुरातील नागरिक आपले वैयक्तिक काम घेऊन येतात अशा व्यक्तींना गेट वरती अडवून त्यांच्याकडे अनाधिकृतपणे काम करुन देण्याचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून जास्त पैसे लुटण्याचे काम संजय गावंडे करीत असून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र महासचिव निलेश हिवराळे यांनी केले आहे.



संजय गावंडे हे गुंड व गुन्हेगारी मानसिकतेचे व्यक्ती असुन आरटीओ कार्यालयातील कर्मचारी व अधिका-यांना धमकावून "तुमची कमिश्नर ऑफिसकडे खोटी तक्रार करतो. तुम्ही मला ओळखत नाही, माझे कोणीही काही करु शकत नाही" अशा भाषेत धमक्या देऊन त्यांच्याकडून खंडणी मागण्याचे काम सुध्दा संजय गावंडे हे करीत असतात. संजय गावंडे यांची २०१६ मध्ये, अधिका-याची बोगस स्वाक्षरी करुन बेकायदेशीर काम करण्याचे व अधिका-यांना धमकाविण्याबाबतच्या गुन्हयाची FIR, पोलीस स्टेशन रामनगर येथे दाखल आहे. हे सर्व कार्यालयत होत असताना सुध्दा अशा व्यक्तींना प्रादेशिक परिवहन अधिकारी ,सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या दालनात प्रवेश मिळतो.



कर्मचारी तसेच अधिका-यांच्या कामात दबाव तंत्राचा वापर करुन सदर व्यक्ती शासकीय कामात अडथळा निर्माण करीत असतो. तसेच कर्मचारी व अधिका-यांची खोटी तक्रार आपल्या मुंबई येथील कमिश्नर ऑफिसला करुन त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा नाहक प्रयत्न सदर व्यक्ती करतो व आपल्या कमिश्नर ऑफिस कडून त्या कर्मचारी किंवा अधिका-याला जबाब मागण्यात येतो. त्या आधी याची गुंड व गुन्हेगारी प्रवृत्ती लक्षात कां घेण्यात येत नाही ?असा सवाल त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.



अशा गुन्हेगारी व गुंड प्रवृत्तीची व्यक्ती परत आपल्या कार्यालयात आढळून आल्यास आमच्या संगठनाच्या युवा कार्यकर्त्यांकडून त्याचा निरोप घेण्यात येणार व तीव्र आंदोलन करुन सामान्य नागरिकास न्याय देण्याचे काम आमच्या संगठन कडून करण्यात येणार तरी सदर व्यक्तीवर तीन दिवसाच्या आंत गुन्हा दाखल करुन या व्यक्तीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा आरटीओ कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निलेश हिवराळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे