चंद्रपूर जिल्ह्यात मागील महिन्यांपासून गोळीबाराच्या घटनेमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे यातच गुन्हेगारीच्या आलेख वाढताना दिसून येत आहे यातच आज चंद्रपूर शहरातील बिंनबा गेट परिसरामध्ये असलेल्या शाही दरबार या हॉटेलमध्ये जेवण करत असताना हाजी सरवर शेख (अली) नामक इसमावर सात अज्ञात आरोपीने गोळ्या झाडल्याने गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
प्राप्त माहितीनुसार घुग्घुस येथील कुख्यात गुंड हाजी सरवर शेख (अली) हे बिनबा गेट जवळील शाही दरबार या हाँटेलमध्ये जेवण करीत असतांनाच अचानक पाच आरोपींनी हाजी अली यांच्यावर हल्ला केला त्यात हाजी अली पळून जाण्यासाठी धावले मात्र आरोपींनी आपल्या बंदुकीने त्यांच्यावर वार केला.
हाजी अली याचे नुकताच कारागृहातून सुटका झाल्याचे कळते,हाजी सरवर शेख (अली )यांची मागील पार्श्वभूमी गुन्हेगारीची असून अवैध कोळसा व्यापारात त्याचा फार मोठा दरारा होता.त्याच्या हत्येमुळे एक अध्याय समाप्त झाल्याचे बोलल्या जात आहे.हाजी अलीची हत्या जुन्या वैमनस्यातून झाल्याचे सांगितले जात आहे.या हत्येनंतर पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.