मेंढपाळांना त्रास देणाऱ्या वनाधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे वनमंत्र्यांचे आदेश



मेंढपाळाच्या चराई साठी जंगल नाही वन अधिकारी मेंढपाळ बांधवांना जंगलात शेळ्या मेंढ्या चराईसाठी मनाई करतात.त्यामुळे मेंढपाळानी शेळ्या मेंढ्या चारावे कुठे हा प्रश्न मेंढपाळांना नेहमी भेडसावत असतो.पावसाळ्यात शेतकऱ्यांची पिके असतात.आणि दुसरीकडे वनविभागाचे अधिकारी मेंढपाळांना जंगलात चराई करू देत नाही.अश्या परीस्थीतीत मेंढपाळांनी काय करावे यासाठी गेल्या दोन दशकांपासून सततचा पाठपुरावा करणे सुरू आहे.


धनगर समाजाच्या पाठपुराव्याची दखल घेत महसूल व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सोबत व्हिडिओ काॅन्फरन्स व्दारे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळांच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केले. यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ विकास महात्मे उपस्थित होते.


जंगलात चराईसाठी मेंढपाळाकडून अवैधरित्या खंडणी मागणाऱ्या वन अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.वेळोवेळी मेंढपाळावर अनेक आपत्ती येत असतात यासाठी संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले व येत्या पाच दिवसांत ही समिती गठीत करण्याची सुचना यावेळी करण्यात आले.


बोगस झाडे धनगर प्रकरणात लवकरात लवकर बहुजन मागास कल्याण मंत्री श्री.अतुल सावे यांचे सोबत मंत्रालयात बैठक घेऊन बोगस झाडे प्रकरण मार्गी लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करण्याचे आश्वासन वनमंत्री सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी या बैठकि दरम्यान दिले.


धनगर समाजासाठी असलेल्या यशवंतराव होळकर घरकुल योजना एकाही लाभार्थ्यांना  मंजूर करण्यात आले नाही याबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधून सदर योजना अडली कुठे याबाबत विचारणा करून 

लवकरात लवकर घरकुल योजनेचा लाभ धनगर समाजाला मिळावा यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये वनमंत्री यांचे दालनात धनगर समाज संघर्ष समिती नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. तुषार मर्लावार, श्री. विजय कोरेवार माजी सभापती, श्री. संजय कन्नावार विदर्भ महासचिव रासप,धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष संदीप शेरकी ,सामाजिक कार्यकर्ते राहुल डंकरवार सहभागी झाले होते.