मुल (प्रति.)
येत्या एक ते दिड महीन्यात महाराष्ट्रातील विधानसभेचा बिगुल वाजणार आहे. सर्वच पक्षातील नेते आपल्यालाच तिकिट मिळेल या दृष्टीने कामाला लागले आहेत. चंद्रपुरातील सहा ही विधानसभा क्षेत्रात आमदारकिचे स्वप्ने बघणारे नेत्यांनी मतदारांच्या भेटी-गाठी घेणे सुरू केले आहे. पाच वर्षांत कधी दिसले नाही असे नेते आज मतदारासंघात काम करीत असून पक्ष "आपल्याला"च तिकीट देईल, इतका विश्वास या "स्वयंभू" नेत्यांमध्ये पाहायला मिळत आहे, यातुन बल्लारपूर -मुल विधानसभा क्षेत्र ही सुटला नाही.
महाराष्ट्राचे वजनदार नेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा हा निर्वाचन क्षेत्र सध्या चर्चेचा विषय असून अनेकांच्या नजरा या क्षेत्राकडे लागल्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या क्षेत्रातून मुनगंटीवार यांना पराभुत व्हावे लागल्यामुळे सध्या सर्वांचे लक्ष बल्लारपूर विधानसभा क्षेत्राकडे आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांतील सर्वांनाचं आपल्यालाचं आघाडीची तिकिट मिळेल ही अपेक्षा आहे.
सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वेगळी स्थिती पहायला मिळणार आहे. २०१९ मध्ये भाजप-काॅग्रेसची चांगलीच चुरस पहायला मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावर असलेले काॅग्रेसचे उमेदवार डॉ. विश्वास झाडे यांना 52,762 इतकी मते मिळाली त्यातच बहुजन वंचित आघाडी कडून राजू झोडे यांनी आपली उमेदवारी दाखल करीत तब्बल 39958 मते घेतली. मुनगंटीवार यांनी 86002 मते घेऊन विजय मिळविला होता.
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात माळी, कुणबी, धनगर ( ओबीसी) प्रवर्ग संख्या जास्त आहे. त्यामुळे माळी समाजाचे व्होट बँक बघता माळी समाजातून सध्यातरी दोन उमेदवार आपले नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात आहेत. चर्चेत असलेले महायुतीचे इच्छुक उमेदवार १) सुधीर मुनगंटीवार (भाजप) २) संध्याताई गुरनुले (भाजप) ३) नितीन भटारकर (राष्ट्रवादी काँग्रेस) ४) पक्षादेश असल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष ही या निवडणुकीत आपला उमेदवार देणार आहे.
तर महाविकास आघाडी १) संतोष रावत (काँग्रेस) २) डॉ अभिलाषा गावतुरे (काँग्रेस) ३)दिनेश चोखारे काँग्रेस ४) घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस ५) विनोद अहीरकर, काँग्रेस ५) प्रकाश पाटील मारकवार, काँग्रेस ६) राजेद्र वैद्य राष्ट्रवादी (शरद पवार) ७) संदीप गिर्हे (शिवसेना उबाठा) अशी भली मोठी उमेदवारांची यादी या विधानसभा क्षेत्रात आपले नशीब आजमविण्यास सध्या तरी सक्रिय झाली आहे. मुनगंटीवार यांना ही निवडणूक प्रतिष्ठेची असून या निवडणुकीत त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार असल्याचे सध्यातरी चित्र आहे.