चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील कंत्राटदार तिरुपती कन्स्ट्रक्शन मध्ये कार्यरत कंत्राटी कामगार अनिल राजभर हे गेल्या तिन दिवसांपासून कामावर असताना बेपत्ता झाले होते.त्यांचा मृतदेह सिटीपीएस च्या एका नाल्यात आढळून आले.सदर घटनेची माहिती महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष (चंद्रपूर,गडचिरोली ) अमोल मेश्राम यांना मिळताच त्यांनी कंत्राटदारांकडून कुटुंबीयांना न्याय मिळवून दिला .
दिनांक ९ सप्टेंबर २०२४ रोजी चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील कंत्राटदार तिरुपती कंट्रक्शन मध्ये कंत्राटी कामगार अनिल राजभर हे दुपारच्या पाळीत कामावर गेले होते.तेव्हापासून ते घरी परतले नाही.तब्बल तिन दिवसानंतर त्यांचा मृतदेह सिटीपीएस मध्ये एका नाल्यात आढळून आले.सदर घटनेची माहिती प्रशासन आणि कंत्राटदाराला मिळताच त्यांनी त्वरित सीआयएसएफ व स्थानिक दुर्गापूर पोलीस स्टेशनला माहीती दिली.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कर्मचारी सेनेचे जिल्हाध्यक्ष ( चंद्रपूर) अमोल मेश्राम यांना कळताच त्यांनी त्वरित कंत्राटदार व ctps प्रशासन यांचेकडे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली.त्याच्या मागणीनुसार कंत्राटदार व प्रशासनाने मागण्या मंजूर करीत कुटूबीयांना न्याय दिला आहे.
यात कुटुंबातील एका व्यक्तीला कामावर घेणार, पीएफ हेल्थ इन्शुरन्स च्या माध्यमातून आठ लाख रुपये, कंपनीकडून मुतकाला चार लाख रुपये चेक द्वारे व मयतेसाठी 50 हजार रुपये व सी एस आर फंडा मार्फत नवीन नियमानुसार योग्य बेनिफिट व ई आय सी मार्फत कुटुंबाला आजीवन पेन्शन देण्याचे मान्य करण्यात आले.
यावेळी तिरुपती कंट्रक्शन चे सुपरवायजर राजेश बोंदगुलवार काँग्रेसचे नेते राजेश अडुर व समाजसेवीका संध्याताई तोकल यांच्या उपस्थितीत मागण्या मान्य करीत धनादेश देण्यात आले