धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीत समावेश करण्याच्या मागणीसाठी पंढरपूरसह राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल धनगर जमात समन्वय समितीच्या शिष्टमंडळासोबत आज मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथीगृहात मा मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे यांच्या अध्यक्षेत बैठक पार पडली.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर ,इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे
गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.आय.एस.चहल, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव गणेश पाटील उपस्थित होते. तसेच इतर मागास बहूजन कल्याण मंत्री अतुल सावे, प्रधान सचिव विनिता वेद-सिंघल दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते. शिष्टमंडळात सर्व आजी माजी आमदार तसेच समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी हे देखील उपस्थित होते.