आधीच धुळीने त्रस्त असलेल्या घुग्घुस वासींयाना पुन्हा लायड मेटल कंपणीचे जाळे विस्तार करण्यासाठी सरसावली असून पुन्हा घुग्घुस वासीयांच्या डोळ्यात मोठी धुळ फेकणार आहे.सदर प्रस्तावित विस्तारीकरण त्वरीत थांबवावी यासाठी पर्यावरण मुख्य प्रधान सचिव पर्यावरण मंत्रालयाला राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ प्रदेश महासचिव संजय कन्नावार यांनी निवेदन दिले आहे.
दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी Lloyds Metals and Energy Ltd च्या प्रस्तावित विस्तारीकरण करण्यासाठी जनसुनावणी घेण्यात येणार आहे. या विस्तारामुळे होणारे आरोग्याचे दुष्परिणाम घुग्घुस वासींयासाठी अतिशय गंभीर आहेत आणि या प्रस्तावाला मान्यता मिळाली तर संपूर्ण परिसरातील जनतेचे जीवन संकटात येईल. हा विस्तार मंजूर झाल्यास त्याचे परिणाम अत्यंत धोकादायक ठरतील, त्यामुळे हा प्रस्तावित विस्तारीकरण थांबविण्यात यावा अशी मागणी संजय कन्नावार यांनी केले आहे.
सध्याच्या प्रकल्पामुळे परिसरातील हवेचे प्रदूषण धोकादायक पातळीवर आहे.PM10 आणि PM2.5 सारख्या धुलकणाचे प्रमाण अत्यंत वाढले असून लोकांना श्वसनाचे विकार आणि अन्य आजारांना सामोरे जावे लागत आहे. हा विस्तार मंजूर झाल्यास औद्योगिक प्रक्रियेमुळे विषारी वायु चे उत्सर्जन वाढेल, ज्यामध्ये सल्फर डायऑक्साइड (SO), नायट्रोजन ऑक्साइड (NO) आणि कार्बन मोनोक्साइड (CO) यांचे प्रमाण अत्यधिक असेल. यामुळे या गुणवत मोठी घसरण होईल, ज्यादा पेट परिणामस्थानिक लोकांच्या आरोग्यावर होणार आहे. स्थानिक प्रशासनाने आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचा गांभीर्याने विचार करावा आणि हा विस्तार त्यारित थांबवावी,
सध्याच्या प्रकल्पामुळे औद्योगिक सांडपाणी स्थानिक जलस्रोतांमध्ये मिसळत आहे. प्रस्तावित विस्तारामुळे जलप्रदूषणाचा धोका आणखी वाढेल, रासायनिक सांडपाणी भूमिगत जलस्त्रोत आणि जलप्रवाहांमध्ये मिसळेल, ज्यामुळे पाण्याचा दर्जा खालावेल आणि पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्ता कमी होईल
या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात पाण्याच्या टंचाईची समस्या निर्माण होईल आणि स्थानिकांचे आरोग्य गंभीर धोक्यात येईल. हे स्पष्ट आहे की, कंपनीच्या विस्तारामुळे जनतेचे पाणी हक्क देखील धोक्यात येणार आहेत.व इतर मृदा प्रदूषण, ध्वनिप्रदूषण असे अनेक प्रदूषण या कंपन्यांमुळे होणार आहे.त्यामुळे सदर होऊ घातलेल्या जनसुनावणी रद्द करुन सदर कंपनीचे प्रस्तावित विस्तारीकरण थांबविण्यात यावे अन्यथा मोठे जनआंदोलन राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार यांनी केले आहे