भाजप काँग्रेस एकाच माळेचे मणी असून आतापर्यंत सत्तेत राहण्याचा उपयोग घेतला आहे कधी काँग्रेस तर कधी भाजप या दोघांचे सत्ता राज्यात आलेली आहे एकदा राष्ट्रीय समाज पक्षाला संधी दिल्यास महाराष्ट्रातील शेतकरी शेतमजूर आणि बेरोजगारांना न्याय मिळण्याची शाश्वती देऊ सध्या आम्ही राष्ट्रीय समाज पक्ष हे स्वबळावर लढण्याची ताकद निर्माण करीत असून 288 जागा लढविणार असल्याचे मत माजी मंत्री राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी तिवसा येथील आयोजित जाहीर सभेत केली.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा क्षेत्रात जाहीर सभा घेण्यात आली सभेच्या अध्यक्षस्थानी अशोकराव देशमुख हे होते तर कार्यक्रमात प्रा.राजू गोरडे,डॉ तौसीफ शेख अध्यक्ष विदर्भ प्रदेश, विदर्भ महासचिव संजय कन्नावार,दत्ता मेश्राम व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी ॠषीकेश भरत रेळे यांचे खंजीरी एक्स्प्रेस समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.यावेळी त्यांनी प्रबोधनात्मक विचार मांडून उपस्थीतांचे मने जिंकली
या जाहीर सभेला संबोधित करताना जानकर म्हणाले की घराणेशाही मोळीत काढून शेतकरी शेतमजूर लोकांच्या हातात राज्याची सत्ता तयार करा तेव्हा खरे अर्थाने राज्यात शेतकऱ्यांचे राज्य येईल, शेतकऱ्यांनी फक्त शेतीवर अवलंबून न राहता शेती सोबत जोड धंदा करावा तेव्हाच शेतकरी सुखी होईल.बेरोजगाऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्यांना प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी केले.