दुःखद बातमी : अखेर अम्मा हरपल्या ,आमदार जोरगेवारांना मातृशोक,


चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांची आई गंगुबाई जोरगेवार "अम्मा" यांचे त्यांचे राहते घरी राजमाता निवास, कोतवाली वॉर्ड, चंद्रपूर येथे रविवार दि. 20 ऑक्टोंबर रोजी सकाळी 09.15 वाजता दुःखद निधन झाले. आमदार जोरगेवार यांनी कोरोना काळात अम्मा चे टिफीन गोरगरीब जनतेसाठी सुरू केले होते.अम्माचे टिपीनची चर्चा देशभरात झाली.अम्मा टिपीन साठी त्यांना अनेक पुरस्कार व अनेक नेत्यांनी प्रत्यक्षात अम्माची भेट घेऊन प्रशंसा केली. गंगुबाई जोरगेवार ह्या पिढीजात व्यवसाय चालवीत होते.अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी जुन्या पालीकेच्या सात मजली इमारतीच्या खाली टोपल्या विकण्याचा व्यवसाय सुरू होता‌. गंगुबाई जोरगेवार यांच्या निधनामुळे जोरगेवार परीवारावर खुप आघात झाले आहे. जोरगेवार कुटूबीयांच्या दुःखात चंद्रपूर क्रांती परीवार सहभागी आहे



हेही वाचा 
चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनच्या बोवाडे वर प्रशासन मेहेरबान?


उद्या होणार अंतीम संस्कार


दिनांक. 21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 09.00 वा. राजमाता निवासस्थान कोतवाली वॉर्ड येथून दस्तगिर दर्गःह, गांधी चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते बिनबा गेट मार्गे अंतिम यात्रा निघून शांतिधाम येथे अंतिम संस्कार होणार आहे.