दुर्गापूर पोलिस स्टेशन हद्दीत चालणारी सट्टा बाजार बंद करण्याची मागणी



दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीतील सट्टा बाजार खुप मोठ्या प्रमाणात चालू आहे. यांचा वाईट परिणाम शाळकरी मुले विद्यार्थी वर होत आहे. दुर्गापूर च्या हद्दीतील पोलीस स्टेशन च्या अगदी हाकेच्या अंतरावर हा सट्टा बाजार अवासीक जाकीर अनवर हुसेन यांची एका खोलीमध्ये सट्टा व जुगार खुलेआम पट्टी सुरु आहे. सट्टा व्यावसायिक  जाकीर यांना जुगार बंद करण्यासाठी समजाविण्यात आले आहे. परंतु त्यांच्या कडून उत्तर मिळते  की पोलीस स्टेशन मैने मॅनेज किया है मेरा कोई कुछ नहीं बिधाड़ सकता असे सांगण्यात येते. अशी तक्रार  चंद्रपूर काॅग्रेस कमेटी माथाडी कामगार आघाडी चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष अब्दुल जामील शेख यांनी पोलिस महासंचालक व पोलीस अधीक्षक यांच्या कडे तक्रार केली आहे. 


त्यांनी तक्रारीत पोलीस अधीक्षक यांना आपण जेव्हापासून जिल्हा अधिक्षक म्हणून रुजू झाले तर अवैध धंदे आपण बंद केले आपण एक कर्तव्य निष्ठ अधिकारी म्हणून आपली ओळख आहे. तर जाकिर ला कोणाचा अभय आहे ही चर्चा लोकांत रंग आहे तरी आपणास विनंती आहे त्वरीत कार्यवाही करून गुन्हा दाखल करण्यात यावे असे तक्रारीत नमूद केले आहे. येत्या आठ दिवसांत कारवाई न केल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी केला आहे.