चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीत एससी, एसटी, ओबीसींच्या हक्कांचे उल्लंघन करून बेकायदेशीर नोकरभरती व प्रत्येक उमेदवारांकडून 25 ते 40 लाख रुपये घेऊन कोट्यावधीचा भ्रष्टाचार केला जात असल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीच्या माध्यमातून 2 जानेवारीपासून साखळी ठिय्या आंदोलन सुरु होते, दरम्यान शासन प्रशासन आंदोलनाची दखल घेत नसल्याने समिती सदस्य मनोज पोतराजे यांनी दि. 16 जानेवारी 2025 रोजी पासून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यालयासमोर समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पण आता तरीही शासन प्रशासनाकडून कुठलाही संवाद आंदोलनकर्त्याशी केला जात नसल्याने आमरण उपोषणकर्ते मनोज पोतराजे हे उद्यापासून अन्नासह पाणीही त्यागणार असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रातून समोर येत आहे, तब्बल 6 दिवसापासून अन्नत्याग आणि आता पाणी त्याग सुद्धा मनोज पोतराजे हे करणार असल्याने अगोदरचं प्रकृती खालावली असतांना आता पाणी त्यागानंतर किती गंभीर स्थिती होईल याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान माझ्या जिवाला काही झालं तर जिल्हा प्रशासनासह बैंक अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व विभागीय सहनिबंधक जबाबदार राहिलं असा इशारा सुद्धा मनोज पोतराजे यांनी दिला आहे.
काय आहे आंदोलनकर्त्यांच्या मागण्या?
1) आयटीआय कंपनीने घेतलेल्या परीक्षेचे कट आउट गुण व या परीक्षेत सर्व परीक्षार्थीचे गुणांसह यादी प्रकाशित करावी,
2) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सेवा नियमावली मध्ये मागासवर्गीयांकरिता शासकीय नियमाप्रमाणे भरण्यात तरतुद करण्यात येईल असे नमूद असताना त्या भरल्या गेले नाही त्यामुळे त्या सरत्या रद्द करून नवीन सरळसेवा भरती घेण्यात यावी.
3) सिडीसीसी बैंकेच्या कालबाह्य संचालक मंडळाला बरखास्त करून प्रशासक नेमावा व नव्याने निवडणूक घ्यावी यासाठी मा. मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणीकरिता जी याचिका आहे त्यात 26 व 27 जानेवारीला निकाल येण्याची शक्यता असल्याने तो पर्यंत भरती प्रक्रिया थांबवावी.
4) सिडीसीसी नोकर भरतीत मागासवर्गीयांचं आरक्षण डावलल्याने त्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल आहे त्याची अंतिम सुनावणी होतं पर्यंत कुठलीही भरती प्रक्रिया करू नये
5) मुलाखतीच्या सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सर्वत्र जाहीर करावे
6) सिडीसीसी बैंकेने सन 2013 मध्ये त्यांच्या उपविधीमध्ये 97 वी घटना दुरुस्ती केली त्यात मागासवर्गीयांचे नोकर भरतीत आरक्षणाची तरतूद केली ती लागू करावी.
7) शासनाचा सन 2018 मध्ये जो अध्यादेश आहे तो बैंकेत नोकर भरती करतांना आरक्षणासह लागू करावा.
8) शासनाचा आदिवासी बहुल जिल्हा असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात अनुसूचित जमाती ना अतिरिक्त आरक्षण लागू आहे तो 25 फेब्रुवारी 2022 चा अध्यादेश लागू करावा.
9) सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरती परीक्षेत मोठा घोळ झाला त्यामुळे आयटीआय या विवादीत कंपनीने घेतलेली परीक्षा रद्द करून टिसीएस सारख्या नामांकित कंपण्याद्वारे पारदर्शक पद्धतीने नव्याने परीक्षा घेण्यात यावी.
10) सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष व संचालक यांनी प्रत्येक उमेदवारांकडून 30 ते 40 लाख नोकरी करिता घेतले त्याची एसआयटी द्वारे चौकशी करण्यात यावी.