मुल - मुल शहराजवळ शेतात असलेल्या मेंढ्याच्या कळपावर नरभक्षक वाघाने हल्ला करीत मेंढपाळ मल्लाजी येगेवार रा. मुल यास ठार केले. दि.७ मार्च २०२५ रोजी रात्रीची घटना असून आज पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.नरभक्षक वाघाच्या हल्ल्यात सलग दोन मेंढपाळ बळी गेल्याने मेंढपाळामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.दि.६ मार्च २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास मुल एमआयडीसीतील राजुरी स्टील प्लांट च्या बाजूला असलेल्या मेंढपाळाच्या कळपावर नितेश कोरेवार या मेंढपाळावर नरभक्षक वाघाने हल्ला करीत ठार केले.
मुल शहरापासून सोमनाथ मार्गांवर अगदी हाकेच्या अंतरावर शेतात रात्री मुक्कामी असलेल्या शेळ्या मेंढ्याच्या कळपावर नरभक्षक वाघाने हल्ला करीत मेंढपाळ मल्लाजी येगेवार वय 60 रा. मुल यास ठार केल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे. काल एमआयडीसी परिसरात निलेश कोरेवार या मेंढपाळाचा वाघाच्या हल्यात मृत्यू झाला तर आज मलाजी येगेवार यांचा मृत्यू झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वाघास जेरबंद करण्याची अशी मागणी मुल तालुक्यातून होत आहे.