गडचिरोली वनविभागा अंतर्गत चातगांव वनपरिक्षेत्रातील नियतक्षेत्र आंबेशियणी येथील राखीव वन कड़ा ४१२ व ४१३ चे सिमेमध्ये २ वाघाची शिकंजे लावून शिकारी करण्यात आली होती. सदर वाघ शिकारीतील वाघाचे कातडे व १७ किलो हाडे हे गुवाहाटी येथे आसाम वनविभाग, पोलिस व WCCB यांनी संयुक्त कार्यवाही करुन ५ आरोपीला पकडले व गुन्ह्याची नोंद केली.
सदर जप्त मुद्देमाल हा गडचिरोली वनविभागातील मौजा आंबेशिवणी जंगलात शिकार केलेल्या वाघाचा असल्याचे समजले. यावरुन २३/७/२०२३ चे रात्रो आंबेशिवणी गावात मुसाफिर म्हणून राहत असलेल्या हरियाणा व पंजाब राज्यातील लोकांच्या झोपड्यावर धाड टाकण्यात आली त्यात त्यांचेकडून शिकारीचे साहित्यासह वाघाचे तिन नखे जप्त करण्यात आली. व एकूण १३ आरोपीला अटक करण्यात आली. ५ आरोपींना गुवाहाटीच्या कारागृहातून चौकशी करीता ताब्यात घेतले व फरार आरोपी १७ होते.
गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक रमेश कुमार व गडचिरोली वनविभागाचे उपवनसंरक्षक मिलिश दत्त शर्मा यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक अंचरलाल मडावी यांनी चातगाव वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल सोनटक्के यांचे नेतृत्यात चातगाव वनपरिक्षेत्रातील कर्मच्या-यांची चमु तयार करुन मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यातील तेहा-चडोत या गावातून WCCB चे वन्यजीव निरीक्षक डॉ प्रगतिश यांचे सोबत वनविभाग गडचिरोलीच्या टिमने संयुक्त कार्यवाही करुन फरार आरोपी सुमनदेवी हीला ११ फेब्रुवारी २०३५ ला अटक करुन गडचिरोली येथील न्यायालयात हजर केले असता १९ मार्च पर्यंत ७ दिवसाची वनकोठडी दिलेली आहे.
सदर कार्यवाही करतांना वनपरिक्षेत्र अधिकारी चातगावचे सुनिल सोनटक्के यांचे सोबत वनपाल साईदास मडावी, वनपाल धनश्री दिकोंडावार, वनरक्षक हिना पदा यांनी महत्वाची भुमिका बजावली.
सदर कार्यवाही करतांना वनपरिक्षेत्र अधिकारी चातगावचे सुनिल सोनटक्के यांचे सोबत वनपाल साईदास मडावी, वनपाल धनश्री दिकोंडावार, वनरक्षक हिना पदा यांनी महत्वाची भुमिका बजावली.