चंद्रपूर येथे रामनवमीनिमित्त ६ एप्रिल ला चंद्रपूर शोभायात्रा समितीतर्फे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही शोभायात्रा उत्सव समिती तर्फे प्रत्येक समाजाच्या या शोभायात्रेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले त्या अनुषंगाने सोनार समाजाचे सुद्धा या शोभा यात्रेमध्ये सहभागी होण्याचे ठरविले आणि शोभायात्रेतील भाविकांना पाणी बॉटल जल वितरणाचा निर्णय घेण्यात आला होता .
सोनार समाजातर्फे येथील जयंत टॉकीज चौक आझाद बागेसमोर भव्य मंडप उभारण्यात आला आणि तिथे जल वितरणाच्या भव्य कार्यक्रम आयोजित केला श्री.प्रफुल चावरे अध्यक्ष सोनार समाज बहुउद्देशीय संस्था यांच्या कुशल नेतृत्वात समाज बांधव आणि समाज भगिनींनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदविला जल वितरणाद्वारे जवळपास 5000 पाणी बॉटल चे वितरण करण्यात आले.
या उपक्रमाचे समाजाच्या सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे या पुढेही समाजाच्या वतीने असे सामाजिक कार्यक्रम भविष्यात सुद्धा घेत राहील ही भावना समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात आली.
यावेळी संस्थेचे मार्गदर्शक श्री प्रकाशजी लुतडे, श्री.विलासजी लुतडे, श्री.प्रवीणजी जुमडे, श्री.नितीनजी काळे, श्री.भास्करजी सरोदे, श्री.राकेशजी मस्के, श्री.लोकेशजी हर्षे, व संस्थेची कार्यकारणी श्री.प्रमोदजी चित्रीव, श्री.गजाननजी उरकुडे, श्री.अमृतजी गजपुरे, श्री.सुमेधजी कासुलकर, श्री.नागराजजी पोहेकर, श्री.दौलतजी गोरे, श्री.अभिजीतजी जुमडे, श्री.गणेशजी देवगडे, युवा कार्यकारणी अंकित गजपुरे, सोनू चावरे, स्वप्नील भुजाडे, सौरभ पोहेकर, तुषार पांढरे, निशु बुजाडे, महिला कार्यकारणी सौ.राधाताई सरोदे, सौ.शितलताई मस्के, सौ.किर्तीताई काळे, सौ.विद्याताई चित्रीव, यांच्या उपस्थिती मध्ये हा कार्यक्रम पार पडला.