आदीवासी बांधवांवर अन्याय होत असल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी पालकमंत्री डॉ.ना.अशोक उईके यांना निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागा त्यांच्या परीवारातील सदस्यांना आमीष देऊन बेकायदेशीर पुणे जमीनी बळकावली आहेत. मुळ जमीनीचे मालक हे पत्र्याच्या शेडमध्ये राहून आपले वास्तव्य करीत आहेत.मात्र बिल्डर बेकायदेशीर रित्या जमीनी हडप करून आदीवासी बांधवांवर अन्याय करीत आहेत.
कुळमेथे कुटीबीयांना कधी तेथील रहिवासीयांकडून कधी बिल्डर कडून जीवे मारण्याच्या व स्वताच्या जमीनीवरून हाकलून देण्याच्या धमक्या येत असल्याने कुळमेथे परीवारातील जेष्ठ महिला व लहान मुले कायम दहशतीत जगत आहेत. या वारसानपैकी पंचफुला वसंता मडावी ही भगवान भीवा कुळमेथे यांची मुलगी असून ती एकटी या विरोधात लढा देत आहे तसेच श्री.तानबा भगवान कुळमेथे ,श्री.नामेदव भगवान कुळमेथे,श्री.सौ. निर्मला शंकर कन्नाके,श्रीमती पंचफुला वसंत मडावी, सौ. लक्ष्मीबाई बालाजी जुमनाके, सौ. शंकुतला शामराव मंगाम ,सौ. संगीता विठ्ठल धुर्वे असुन हे सर्व भगवान कुळमेथे यांचे आपत्य असून यातील कुणालाही पिढीजात जमिनीचा फायदा झालेला नाही.
कुळमेथे कुटीबीयांनी जमिन कुणालाही विकली नसतांना अनेकांनी त्यांच्या जमिनीवर बेकादेशीर रित्या अतिक्रमण केलेले आहे. व त्यांना आजुबाजूने त्यांच्या जमिनीवर जर असलेले काही जन त्या महिलेला मनपा कर्मचारी, तहसिल कार्यालयातील कर्मचारी व पोलीसांना हाताशी धरून तीच्यावर व स्वतःच्या राहत्या जागेवरून हाकलण्याचा प्रयत्न करीत आहेत करीता या गंभीर विषयाकडे लक्ष देवून या आदिवासी परीवारांना संरक्षण देवून त्यांची मालकी हक्काची जमीन परत करण्याची विनंती पिढीत महीलेसह शिवसेना जिल्हाप्रमुख बंडू हजारे यांनी पालकमंत्री डॉ अशोक उईके यांना निवेदनाद्वारे केली आहे.