नवरगाव येथील संघ परीवारातून तयार झालेले भाग्यश्री नागरी सहकारी पतसंस्था गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहे.करोडो रुपयांचा उलढाल या बॅकेत होत असते.भाग्यश्री संस्थेचे ७ शाखा उघडण्यात आले आहे.मात्र या पतसंस्थते खोट्या कागदपत्रांच्या आधारे व खोट्या स्वाक्षरीने खाते उघडून शाखा व्यवस्थापकाच्या मदतीने कर्ज उचलण्यात आल्याचे उघडकीस आले असून याबाबतची तक्रार नवरगाव येथील व्यावसायिक प्रमोद परशुराम बारापात्रे यांनी सिंदेवाही पोलिस ठाण्यात केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
देलनवाडी येथील किशोर गोकुलदास लेंझे यांचेकडून वैयक्तीक आर्थीक व्यवहाराची रक्कम घेणे शिल्लक होती. त्यांना सदरची रक्कम परत मागीतली असता किशोर लेंझे यांच्या आर्थीक अडचणीमुळे त्यांनी भाग्यश्री नागरी पतसंस्था शाखा नवरगाव येथे प्रमोद बारापात्रे नावे खाते उघडण्यास सांगीतले. त्यावरून पतसंस्थेत दैनिक बचत खाते (बिंदू सागर खाते) उघडले त्याचा क. ११३१७ असा आहे. अभिकर्ता चंद्रभान गहाणे यांचेकडे दैनिक खात्यात रक्कम भरणे सुरू केले. सदर खात्यात किशोर लेंझे यांनी माझ्या नावे असलेल्या दैनिक बचत खाते क. ११३१७ या खात्यात नियमीत पैसे भरणे सुरू केले.
किशोर लेंझे यांचे नवरगाव येथील शाखेत स्थावर तारण कर्ज खाते क. १७३५ या खात्यावर कर्ज थकीत झाले असल्याने सदर कर्ज खाते अनुत्पादीत होणार असल्याने किशोर लेंझे यांचे कर्ज खाते नियमीत दाखविण्याकरीता २०००/- रू. भरणे आवश्यक होते. किशोर लेझे हे माझ्या नावे असलेले दैनिक बचत खाते क. ११३१७ या बचत खात्यात दैनिक बचत रक्कम भरत असल्याने शाखा व्यवस्थापक , सह सरव्यवस्थापक, अध्यक्ष यांनी संगणमत करून दि. १५/०२/२०२५ रोजी बारापात्रे यांचे नावे कर्ज मागणी अर्ज स्वतः भरून त्यावर खोटी सही करून कर्ज प्रकरण तयार केले. सदरचे कर्ज खाते क. २०१२१६५ या क्रमांकाचे बनावट कर्ज खाते प्रमोद बारापात्रे नावे उघडले. बारापात्रे यांनी शाखेतून कधीही कर्ज घेतले नाही परंतू नावाची दैनिक बचत खाते असल्याचा गैरफायदा घेवून बारापात्रे यांच्या नावाचे खोटे व बनावटी कर्ज मागणी अर्ज तयार केले व त्यावर बनावट स्वाक्षरी करून बारापात्रे यांचे नावे कर्ज दाखविले.
सदर बनावट दस्ताच्या आधारे बनावट कर्ज खाते क. २०१२१६५ या कर्ज खात्यावरून दिनांक १५/०२/२०२५ रोजी बारापात्रे यांचे नावाने खोट्या सहीची पैसे काढण्याची पावती तयार केली. सदर पैसे काढल्याची बनावट पावती दैनंदिन व्यवहारात मंजूर करून बनावट कर्ज खाते क. २०१२१६५ या कर्ज खात्यावरून २०००/-रूपयाची नगदी उचल दाखवून सदरची रक्कम किशोर लेंझे यांचे स्थावर तारण कर्ज खाते क. १७३५ या कर्ज खात्यात जमा केल्याचे कागदोपत्री बनावट व्यवहार दर्शविले. सदरचे व्यवहार तसेच पैसे काढल्याची पावती यावर हस्ताक्षर व स्वाक्षरी तक्रार कर्ते प्रमोद बारापात्रे यांची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शाखा व्यवस्थापक यांनी दिलेल्या झेराक्स प्रती पडताळून पाहिल्या असता सदरचे दस्त संगणमताने खोटया स्वाक्षरी करून कर्ज दाखविण्याकरीता कर्ज मागणी अर्ज भरून बनावट कर्ज प्रकरण तयार केले आहे व या बनावटी कर्ज खात्यातून खोटया स्वाक्षरीने २०००/- रूपयाची रक्कम काढली असल्याचे स्पष्ट होते. बनावट कागदपत्रे व सह्या करून सदर शाखेत व ईतर शाखेत देखील कोटयावधी रूपयाचा आर्थीक अपहार झाला असल्याची शक्यता सदर प्रकरणावरून निर्माण झाली आहे. सदर पतसंस्थेचे आजपर्यंत झालेले लेखापरिक्षण संशयास्पद असून आर्थीक गंभिर गुन्हयाची चौकशी करून शाखा व्यवस्थापक सह सरव्यवस्थापक व अध्यक्ष यांचेवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रमोद परशुराम बारापात्रे यांनी पत्रकार परिषदेत केली.